वणीत संत रविदास जयंती उत्साहात साजरी

जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी समतेचे अग्रदूत संत रविदास महाराज यांची 644 वी जयंती वणीत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील संत रविदास महाराज सभागृह येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच, वणी द्वारा या अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

जयंती निमित्त सकाळी 6 वाजता नगर सेवा समिती व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील संत रविदास सभागृह परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी 9 वाजता वणी शहरातील संत रविदास नगर येथील प्रतिमेस हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी 10 वाजता कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी संत रविदास सभागृहात दीपप्रज्वलन व प्रतिमेस माल्यार्पण करून संत रविदास महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी नामदेवराव धुळे, बाबाराव पिंपळकर, संबा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी कुरील यांनी केले तर प्रास्ताविक व आभार रवींद्र धुळे यांनी केले.

या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा, तालुका पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने चर्मकार समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच, वणीचे पदाधिकारी, सदस्य तसेच संत रविदास जयंती उत्सव आयोजन समिती व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

चुनाभट्टीच्या चिमणीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

यशोगाथा: मारेगाव तालुक्यातील तरुण शेतक-यांनी फुलवली झेंडुची शेती

Leave A Reply

Your email address will not be published.