पाटण येथील आश्रमशाळेत शिक्षकदिन साजरा

शिक्षकांचा सत्कार, विद्यार्थ्यांना खावटी व अन्नधान्य वाटप

सुशील ओझा, झरी: 5 सप्टेंबर रोजी पाटण येथे शिक्षकदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक मुख्याध्यापक अतुल गणोरकर तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक सतिश दासपतवार उपस्थित होते. या वेळी उपस्थित शिक्षक वृंदानी राधाकृष्णन यांच्या जीवन पाटावर प्रकाश टाकला तर मागर्दर्शक म्हणून मुख्याध्यापक सतिश दासपतवार यांनी विधार्थांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान काय ? या विषयावर मार्गदर्शन केले.

कोरोना काळात शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बाबत स्तुती करण्यात आली .मागील वर्षापासून आश्रम शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी केलेले उपक्रम गरजूना अन्यधान्य किटचे वाटप, विध्यार्थीच्या गावी जाऊन यशस्वी अनलॉक लरनिंग, आदिवासी बांधवाना खावटी चे सर्वेक्षण तथा खावटी वाटप, शिक्षणसेतू अभियान, जागतिक आदिवासी दिन, या सर्व नाविन्य पूर्ण उपक्रमात आश्रम शाळेतील शिक्षकांचा फार मोठा सहभाग होता.

त्या निमित्त शाळेतील मुख्याध्यापक यांचे कडून सर्व शिक्षक वृंदाचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित शिक्षक प्रमोद केलेगुंदी, गजानन चंदावार, कु.शुभांगी लिहीतकर, आतीश कडू, राकेश परसावार, राहुल मानकर, विशाल खोले, कु. नीलम गेडाम, विक्रम मुत्यलवार आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

हे देखील वाचा:

मंदिरासमोरच अतिक्रमण करुन बांधले भोजनालय

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.