शेतकऱ्यांना “राष्ट्रीय कृषी बाजार “(e-NAM) अप्लिकेशन बद्दल मार्गदर्शन

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

सुशील ओझा, झरी: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित असलेल्या ‘कृषी महाविद्यालय, कोंघारा ‘, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत विद्यार्थी रोहन बंडुजी वांढरे यांच्या पुढाकाराने वणी तालुक्यातील दहेगाव या गावामध्ये शेतकऱ्यांना ‘राष्ट्रीय कृषी बाजार ‘ (e- NAM) बद्दलचे महत्त्व सांगितले.

त्यामध्ये राष्ट्रीय कृषी बाजार अप्लिकेशन ची नोंदणी कशा पद्धतीने करावी, त्याचे शेतकऱ्यास होणारे फायदे, ती अप्लिकेशन कशा पद्धतीने वापरावी आणि राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) अप्लिकेशन मध्ये खरेदी-विक्री पारदर्शक पद्धतीने कशी करावी तसेच बाकीचे/बेकायदेशीर खर्च संपुष्टात आणून योग्य प्रकारे हमीभाव कसा मिळवावा, ई. बद्दल विद्यार्थ्याने सविस्तर माहिती सांगितली.

या माहिती कार्यक्रमा दरम्यान गावातील शेतकरी बंडू असुटकर , बंडू वांढरे, रविंद्र ठावरी, किशोर येरगुडे, बंडू मोहर्ले, देविदास माथुलकर , आशिष येरगुडे , अदित्य येरगुडे , गजानन तुरणकर,तसेच ग्रामपंचायत दहेगाव येथील सदस्य, आदि उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. महेश राठोड , कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. शुभम शिरपूरकर , प्रा. दत्ता जाधव, प्रा.हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. पल्लवी येरगुडे, प्रा. काजल माने, आदि शिक्षकांचे या विध्यार्थ्याला मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा:

हनुमाननगर येथे एकाच ठिकाणी दोनदा कोसळली वीज

Comments are closed.