ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी जनगणना बहिष्कार परिषदेची स्थापना

वणीत पार पडलेल्या कृती समितीच्या सभेत निर्णय

जब्बार चीनी, वणी: केंद्र सरकारने ओबीसींच्या जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यास नकार दिला आहे. याचा निषेध करत वणीमध्ये ‘जनगणना बहिष्कार परिषदे’ची स्थापना करण्याती आली आहे. ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीची सोमवारी वणीतील धनोजे कुणबी समाज भवनात सभा घेण्यात आली होती. या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्ष ओबीसी (व्हिजे, एनटी,एसीबी) जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार होते, कृती समितीचे निमंत्रक मोहन हरडे होते.

राष्ट्रीय जनगणना – २०२१ मध्ये ओबीसी ची स्वतंत्र कॉलम मध्ये जनगणना करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामुळे ओबीसी समाज संतप्त झाला असन याचा निषेध म्हणून वणीमध्ये “जनगणना बहिष्कार परिषद” घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रा. बाळकृष्ण राजूरकर, प्रा. दिलीप मालेकर, प्रा. अनिल टोंगे, संजयकुमार पेचे, प्रा.डॉ.राम मुडे, हेमराज कळंबे, मंगेश गवळी, प्रवीण खानझोडे, मंगेश गवळी, दिलीप पडोळे, गोविंद थेरे,प्रा. विजय बोबडे, प्रदीप मत्ते, अशोक अंकतवार यांनी जनगणना बहिष्कार परिषद घेण्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. सभेतच कृती समितीचे समन्वयक प्रा.राम मुडे यांनी पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन विकास चिडे यांनी केली. सभेला कृती समितीचे मार्गदर्शक नारायण मांडवकर, पांडुरंग पंडिले, विलास शेरकी, सुरेश मांडवकर तसेच कृती समितीचे समन्वयक रघुनाथ कांडरकर, काशीनाथ पचकटे, अशोक चौधरी, गजानन चंदावार, हेमंत गौरकार, रामराव गोहोकार, आशिष साबरे, संदीप मुत्यलवार, सविताताई रासेकर, सुरेश राजूरकर, नीलकंठ धांडे, विनोद राजूरकर, शेख रहीमभाई, संजय गायकवाड,

शंकर शेंडे, प्रमोद लोणारे, सागर जाधव, रविंद्र ताटकोंडावार, गजानन मत्ते, शैलेश राऊत, राकेश बरशेट्टीवार, प्रवीण येलपूलवार, सुधीर खंडाळकर, राजेंद्र देवडे, गजानन तुराळे, बंडू येसेकर, कवडू नागपुरे यांच्यासह सभेला ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीचे वणी, मारेगाव, झरी येथील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा:

अबब…! बोअरवेलला लागली कळं, पाणी ‘बदंबदं’ गळं

Comments are closed.