उद्या वणीत ‘भारत बंद’ची हाक

दुपारी 12 वाजता टिळक चौकातून निघेल निषेध मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: शेतक-यांचे विविध प्रश्न, तीन कृषी कायदे रद्द करणे, महागाई, खासगीकरण इत्यादी विरोधात सोमवारी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. वणीत देखील हा बंद पाळून आंदोलन करण्यात येणार आहे. या संघटनेत विविध पक्ष तसेच सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने नुकतेच पास केलेल्या तीन कायद्याविरोधात शेतक-यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे कायदे मागे घ्यावे अशी या बंदची प्रमुख मागणी आहे. या संदर्भात उद्या सोमवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आंदोलकांनी टिळक चौकात जमा होण्याचे आवाहन केले आहे. दुपारी 12 वाजता शीवतीर्थावरून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर तहसील कार्यालयावर जाऊन निवेदन दिले जाणार आहे.

या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंदला प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयुक्त किसान सभा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकप, भाकप, वंचित बहुजन आघाडी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी केले आहे.

हे देखील वाचा:

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी जनगणना बहिष्कार परिषदेची स्थापना

अबब…! बोअरवेलला लागली कळं, पाणी ‘बदंबदं’ गळं

Comments are closed.