वणी पोलिसांनी पकडली चंद्रपूरला जाणारी अवैध दारू

0

वणी/ विवेक तोटेवार: शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी माहिती मिळाली की, वणी नांदेपेरा रोडवरून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू जात आहे. माहितीनुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्वरित सूत्रे हलविली व नांदेपेरा रोडवर गाड्याची तपासणी सुरू केली. त्यात एक चारचाकी गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये जवळपास 20 पेट्या एवढी दारू आढळून आली. दारूच्या परवाण्याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे समजले. यात घटनेत दोन इसमास अटक केल्याचे वृत्त आहे.

शुक्रवारी बाळासाहेब खाडे याना माहिती मिळाली की, वणीतून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार खाडे यांनी पोलीस, पंच व फोटोग्राफर यांना सोबत घेतले. वणीतून चंद्रपूर येथे जाणाऱ्या नांदेपेरा बायपासवर वाहनाची तपासणी सुरू केली. समोरून येणाऱ्या टोयोटा इटीएस क्रॉस पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक एम एच 29 आर 5705 या गाडीची तपासणी सुरू केली. सदर गाडीच्या डिकीत 10 चुंगड्या आढळून आल्या. त्याची तपासणी केली असता त्यात देशी दारू 90 एम एल क्षमतेच्या 2000 बाटल्या आढळून आल्या. ह्याची किंमत 52000 हजार रुपये व गुन्ह्यात वापरण्यात येणाऱ्या गाडीची किंमत 4 लाख 50 हजार असा एकूण 5 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या घटनेत गाडी चालक अभय चंदू बुलबुल वय 29 राहणार यवतमाळ व गणेश कांतीप्रसाद बेनी वय 28 राहणार चंद्रपूर याना अटक केली आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांनुसार या दोघांवरही 65(अ)व(ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे , हवालदार अरुण नागतोडे, डी बी पथकाचे सुदर्शन वनोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, दीपक वंदसवार, अजय शेंडे, अमित पोयाम व वाहन चालक प्रशांत आळे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.