अरे बाप रे ! काय आहे हे ? विद्यार्थ्यांचे डोळे विस्मयाने चमकले….

युवकाच्या प्रयत्नातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घडले मुंबई दर्शन

0

मारेगाव, प्रतिनिधीः अरे बाप रे ! काय आहे हे ? विद्यार्थ्यांचे डोळे विस्मयाने चमकले….. मारेगाव तालुक्यातल्या दुर्गम भागातली मुले पहिल्यांदाच मुंबईला गेलीत. तिथली रौनक, तिथली भव्यता व स्वप्नवत जगाची सफर केल्याचा अनुभव त्यांच्या मुखातून सहज निघाला. ‘‘सिटी’’ म्हटलं की आपल्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचंठिकाण एवढंच त्यांनी पाहिलं होतं.

अशा ठिकाणीच कधीतरी या विद्यार्थ्यांना जायला मिळतं. ही सगळी मुलं संपूर्ण मंबई आपल्या डोळ्यांत सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होती. आपल्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा कितीतरी मोठ्ठं, कितीतरी अद्भूत असं काहीतरी हे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात पाहिल्यांदा पाहत होते. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील हे विद्यार्थी. ‘नीड’ ही संस्था या आदिवासीबहूल खेड्यांमध्ये काम करते. सुनील गोवारदिपे यांच्या नेतृत्त्वात शिक्षण या विषयावर इथे जोमात काम सुरू आहे.

आर्थिक व अन्य परिस्थितींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात. शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधांपासून हे वंचित असतात. या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा या प्रवाहात आणण्यासाठी ‘नीड’ या संस्थेच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यातीलच एक हा उपक्रम. मुंबई या स्वप्ननगरीत रमण्याची बऱ्याच जणांची इच्छा असते. मारेगावसारख्या आदिवासीबहूल तालुक्यातील 15 विद्यार्थ्यांचे हे स्वप्न सुनील गोवारदिपे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले. हे विद्यार्थी पहिल्यांदाच इतक्या दूर आले होते. अनेक प्रेक्षणिय, ऐतिहासिक स्थळांना या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्यात. रोजगार, शिक्षण, आत्मरक्षा अशा अनेक विषयांवर त्यांना माहिती देण्यात आली.

ग्रामीण विद्यार्थ्यांचे जीवन फार संघर्षमय आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. अशात काम मिळेल ते काम करतात आणि हलाकीचे जीवन निरंतर जगत राहतात. पण काही विद्यार्थी असतात वेगळे. आयुष्याचे सोनं करणारे व काही वेगळे शिकण्याची जिद्द उराशी बाळगून उम्मेदीचे स्वप्न बघतात. मात्र अनेकांना जीवनात मार्गदर्शक मिळत नसल्याने जीवनाचा मार्ग खड़तर होत जाते. पण आदिवाशी क्षेत्रातील सुनील नावाच्या धेयवेड्या तरुणाने आदिवासी तालुक्यातील विद्यार्थिनीना मुंबई दाखवली आणि तिथे त्या विद्यार्थिना तेथील मान्यवारकडून वेगवेगळे मार्गदर्शन दिले. त्यामुळे त्याना प्रेरणा मिळाली असून त्यांची काहीतरी वेगळे करण्याची जिद्द वाढलेली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थाला एक मार्गदर्शक असतो आणि त्यांना मार्गदर्शकाच्या रूपात समाजसेवेत आपले आयुष्य झोकून देणारा सुनील नावाचा तरुण त्यांचा मार्गदशक बनला.

सुनीलने गेल्या आठ वर्षांत शिक्षणाच्या प्रवाहातून बाहर गेलेल्या अनेक विद्यार्थयाना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. तर अनेकांचे हात बळकट करुण त्यांचे आयुष्य सुखकर केले .दरवर्षी आदिवाशी गरजू शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. ज्यांना पुस्तके मिळत नाही अश्या विद्यार्थ्यांना पुस्तके ही उपलब्ध केली जातात. अशिक्षित तरुणांना एकत्र करुण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा विडा उचलला आहे असे वाटायला लागले आहे .आता या विद्यर्थिनींनासुद्धा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुण त्याना स्वताच्या पायावर स्वावलंबी कसे बनविता येईल असा त्याचा प्रयत्न आहे. सुनील गोवारदिपे यांच्या कार्याची सर्वत्र दखल घेतली जात आहे. सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.