केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खोंड तर उपाध्यक्षपदी वाघमारे

बिनविरोध निवडून आले 13 संचालक

जितेंद्र कोठारी, वणी :   यवतमाळ जिल्हा कार्यक्षेत्र असलेली अग्रगण्य  केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर खोंड तर उपाध्यक्षपदी दौलत वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.  केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी  नुकतेच झालेल्या निवडणुकीत एकुण १३ संचालक बिनविरोध निवडुण आले होते.  निवडणुक निर्णय अधिकारी  व्ही. पी. सहारे यांनी संस्थेच्या कार्यालयात बुधवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडली.  यामध्ये अध्यक्ष म्हणुन  चंद्रशेखर  खोंड व उपाध्यक्ष म्हणुन  दौलत  वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सभेला नवनिर्वाचित संचालक अनिल आक्केवार, गजानन अघळते, सतिश कुल्दीवार, अरुण कावडकर,  किसनलाल खुंगर, प्रदिप  राशतवार, विलास लाखे, सुधिर डांगरे, कल्पना गुंडावार व मुख्य कार्यकारी अधिकारी  दिपक दिकुंडवार आदी उपस्थित होते.  सहाय्यक निबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी व्ही. पी. सहारे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी पिसाळकर व तालुका लेखापरिक्षक अभय निकोडे यांचे मार्गदर्शनाखाली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.