परिसरातील सर्वात मोठ्या नर्सरीला भेट द्या…

चापली नर्सरीमध्ये घराच्या सुशोभिकरणासाठी शेकडो प्रकारचे झाडे उपलब्ध,, भाजीच्या विविध व्हेरायटी उपलब्ध.. वनशेती करा... करोडपती बना.. रोपटे व मार्गदर्शन उललब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: पावसाळा आला की जसे शेतीच्या कामाची लगबग वाढते. तशीच लगबग पर्यावरण प्रेमी आणि फुलझाडांची आवड असणा-यांची असते. झाड आणि वृक्षप्रेमींसाठी वणी शहरापासून अगदी जवळच असलेल्या गौराळा येथील चापली पवनसूत नर्सरी येथे विविध प्रकारची झाडे उपलब्ध झाली आहेत. यात फळांची झाडे, फुलांची झाडे, शोभीवंत झाडे यासह भाजीचे वाण देखील उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे शेतक-यांना अवघ्या 8 ते 10 वर्षात कोट्यधीश बनवणा-या वनशेतीचे विविध रोपटे देखील उपलब्ध आहेत. नर्सरीतील विविध व्हेरायचे रोपटे बघण्यासाठी या नर्सरीला एकदा अवश्य भेट द्या किंवा 9422673133 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चापली पवनसूतचे संचालक राजू तुराणकर यांनी केले आहे.

पावसाळा या ऋतुची पर्यावरण प्रेमी आतुरतेने वाट पाहतात. कारण झाडे लावण्यासाठी हा परफेक्ट काळ मानला जातो. विविध झाडांनी घराची सजावट करणारे देखील याच काळात सजावट करतात. महिलांसह आता पुरुषांना देखील आता झाडे लावण्याचा छंद जडला आहे. आपल्या परिसरात पर्यावरण प्रेमी जरी असले तरी मात्र नर्सरीची संख्या अतिशय बोटावर मोजण्याइतकी आहे. गौराळा (मांगरुळ) येथील चापली पवनसूत नर्सरी ही आपल्या परिसरातील सर्वात मोठी नर्सरी मानली जाते. इथे फळ, फुल, शोभीवंत झाडांच्या देशी विदेशी अशा शेकडो प्रजाती उपलब्ध आहेत.

Podar School

करा आपल्या घराचे सौंदर्यीकरण
चापली पवनसूत येथे घराच्या सुभोगीकरणासाठी विविध झाडे उपलब्ध आहेत. यात इनडोअर व आऊटडोअर झाडांचा समावेश आहे. याशिवाय घराच्या अंगणात किंवा बालकनी, टेरेसमध्ये लावण्यासाठी लॉन देखील उपलब्ध आहेत. यासह विविध प्रकारच्या कुंड्या, शोभीवंत कुंड्या, माती, कंपोस्ट देखील नर्सरीत उपलब्ध आहे.

वनशेती करा… करोडपती बना.. रोपटे व मार्गदर्शन उललब्ध
परंपरागत शेती सोबतच सध्या वनशेतीचा सल्लाही कृषीतज्ज्ञ देतात. वनशेतीमध्ये असे वृक्ष येतात ज्या वृक्षांचा उपयोग फर्निचर, जहाज बांधणी, खेळांचे साहित्य इत्यादी बनवण्यासाठी होतो. वनशेती करून अवघ्या 8-15 वर्षांत कोट्यवधींचे शेतक-यांचे उत्पन्न सुरू होते. चापली येथे चंदन, रक्तचंदन, महोगणी, मिलियादुबिया, बांबू, निलगिरी इत्यादी वनशेतीचे झाडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या रोपट्यांच्या खरेदीवर शासकीय अनुदान तसेच मोफत लागवडीचे मार्गदर्शन केले जाते.

फक्त एका कॉलवर घरपोच सेवा देखील उपलब्ध: राजू तुराणकर
ज्या व्यक्तींना नर्सरीमध्ये येणे शक्य नाही अशा व्यक्तींसाठी आम्ही घरपोच सेवा देखील देतो. ग्राहकांची जी झाडे, बियाणे, कुंड्या, लॉन इत्यादी ज्या गोष्टींची ऑर्डर असते. त्यांना केवळ एका कॉलवर (9422673123) आम्ही सेवा पुरवतो. नर्सरीमध्ये शेकडो प्रजातीचे झाडे आहे. तिथे भेट देऊन आपण स्वत:च्या आवडीनिवडीनुसारही आपल्याला झाडांची निवड करता येते.
– राजू तुराणकर, संचालक चापली

भाजीचे बियाणे देखील उपलब्ध
अनेकांना घराच्या शिवारात भाजीचे उगवण्याची आवड असते. आता हायब्रिडच्या काळात अनेक महिला बालकनी, टेरेसमध्ये छंद म्हणून भाजीची लागवड करतात. याशिवाय शेतकरीही विविध भाजीची लागवड करतात. चापलीमध्ये मिरची, वांगे, टमाटर, पालक इत्यादींचे उत्कृष्ट वाण उपलब्ध आहे. याशिवाय टेरेस आणि बालकनीसाठी सांभार, पालक, मिरची, पुदिना, मेथी इत्यादीच्या लागवडीसाठी पॉट (कुंडी) देखील उपलब्ध आहे.

पत्ता: चापली पवनसूत मल्टीपर्पज प्रोड्युसिंग ट्रेडिंग सर्विसेस
गौराळा (मांगरुळ) ता. मारेगाव
किंवा 9422673123 (राजू तुराणकर) यांना संपर्क साधा

हे वाचलंत का?

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!