विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनच्या काळात मोठया प्रमाणात अवैधरीत्या बंद बारमधून दारू विकल्या गेली असल्याच्या संशय आहे. त्यामुळे बारच्या दारूसाठ्याची तपासणी करावी अशाप्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी यांना शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांच्यामार्फत देण्यात आले आहे.
जवळपास दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण बार बंद ठेवण्यात आले आहे. परंतु या बारमधून अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे वणीतील संपूर्ण बारच्या जुन्या स्टोकाची दारूबंदी अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. तसेच तपासणी च्या वेळी काही शिवसैनिक व पत्रकारांना सोबत घेण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात वणीत अवैध दारूची चढ्या भावाने विक्री होत असल्याचे अनेकदा मीडियामधून बातम्या आल्या आहेत. त्यातच पोलीस प्रशासनाने अनेकदा कारवाया करून याशा प्रकारे अवैधरीत्या विक्री होणारी दारू पकडली होती. ही दारू येत कुठून होती? कारण यावेळी संपूर्ण बार व वाईन शॉप बंद होते हे महत्वाचे.
ही दारू बंद असलेल्या बारमधून येत असल्याचा संशय असल्याने बारच्या जुन्या स्टाकची तपासणी होणे गरजेचे आहे. बंद होण्यापूर्वी विकलेला माल तपासणी दरम्यान मिळालेला माल याचे बॅच क्रमांक तपासावे अशी मागणी केली आहे. निवेदनावर अजिंक्य शेंडे, मंगल भोंगळे, जनार्धन थेटे, मिलिंद बावने. सचिन ठावरी यांच्या सही आहेत.