चिखलडोह गट ग्रामपंचायतीत कॉंग्रेस प्रणीत पॅनलचा दणदणीत विजय

7 पैकी 7 जागा जिंकत उडवला विरोधकांचा धुव्वा

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गट ग्रामपंचायत चिखलडोह येथील 7 पैकी 7 जागा जिंकत विरोधकांचा पराभव करून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात बेलखेडे परिवाराला यश आले आहे.

झरी पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी बेलखेडे त्यांचे पती प्रदीप बेलखेडे व मुलगा अभिमन्यू बेलखेडे यांनी दिवसरात्र एक करीत आपक्या गावातील सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. बेलखेडे कुटुंब गोरगरीब जनतेसाठी वेळोवेळी धावून जातात अशी त्यांची ओळख आहे. सोबतच स्वच्छ प्रतिमा व विकास यामुळे ग्रामस्थांनी यावेळी बेलखेडे यांच्या पॅनलला पुन्हा संधी दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चिखलडोह ग्रामपंचायत निवडणुकीत बेलखेडे पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहे. रामराव शेंडे ,निरुपा कुमरे,अनिल टेकाम, पंकज जुमनाके संजुला ठाकरे विजयी झाले असून या पॅनलकडे एकहाती सत्ता राहणार आहे.

हे देखील वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.