गृह कर्ज माफ करण्याची चिखलगाव वासियांची मागणी

ग्रामसचिवांना निवेदन देऊन ठराव घेण्याची मागणी

0
Mayur Marketing

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे चालू वर्षाचा गृहकर माफ करावा अशी मागणी चिखलगाव येथील नागरिकांनी केली आहे. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत सचिवांना निवेदन दिले आहे.

सध्या लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. लोकांचे रोजगार गेले आहेत. त्याचा फटका व्यवसायालाही बसलेला आहे. दरम्यान कामं बंद असल्याने मजुरांनाही याचा मोठा फटका बसलेला आहे. सरकारने गोरगरिबांसाठी मोफत धान्य व सिलिंडरसाठी काही थोडीबहुत मदत केली आहे. ती मदत खूपच तुटपुंजी आहे. अशा परिस्थितीत गृहकर भरणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामपंचायतने या वर्षींचा गृहकर माफ करावा अशी मागणी चिखलगाव वासियांनी केली आहे

Lodha Hospital

याबाबत ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव घेऊन चालू आर्थिक वर्षांचा गृहकर माफ करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अशोक नागभिडकर, प्रदीप खेकारे, नीलेश दखने, चंद्रशेखर देठे, गणेश पारोळेकर इत्यादींच्या सही आहेत.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!