चिलई येथील संशोधकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथ प्रकाशित
प्रा. डॉ. विजय पावडे यांनी उंचावलं गावाचं नाव
बहुगुणी डेस्क, वणी: ‘नॅनो मटेरियल फॉर ग्रीन एनर्जी’ या विषयावर मुळचे वणी तालुक्यातील चिलई येथील प्रा. डॉ. विजय भाऊराव पावडे यांचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यांनी हा संशोधनपर ग्रंथ विद्यापीठातील डॉ. भारत भानवसे व डॉ. संजय ढोबळे यांच्यासह लिहिला आहे. हा विषयाचं आंतराष्ट्रीय स्तरावर महत्त्व असल्याने या ग्रंथाचा जगभरातील संशोधकांना व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
या ग्रंथाचं प्रकाशन ‘एल्सविय’ या संस्थेद्वारा करण्यात आले आहे. हा ग्रंथ केमिकल इंजिनियर, अप्लाईड फिजिक्सस, मटेरियल सायंस आणि अभियांत्रिकी, रिन्युएबल एनर्जी इत्यादी अभ्यासक्रमांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.
काय आहे नॅनो मटेरियल ?
विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या युगात नॅनोमटेरिल हा कळीचा विषय असून उर्जा साधनांच्या विकासासाठी हा महत्त्वाचा घटक आहे. 555 पानांच्या या ग्रंथात नॅनो मटेरियलची निर्मिती. प्रक्रिय, वैशिष्ट्ये तसेच त्याच्या संशोधनाची तंत्रे व साधने, नॅनो मटेरियलचे फ्युअल सेल, सोलर सेल, वॉटर स्पिलिलिंग, व हायड्रोजन जनरेशन तसेच एलईडी क्षेत्रातील उपयोग यांचा समावेश आहे.
डॉ. विजय पावडे हे नागपूर येथील सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत. मुळचे चिलईचे असलेले विजय पावडे यांनी वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातून बीएस्सी केले असून नागपूर विद्यापीठातून त्यांनी एमएस्सी केले आहे. संशोधक आणि विद्यार्थ्यांना दिशा देणारा त्यांचा आंतराष्ट्रीय स्तरावरचा ग्रंथ प्रकाशित झाल्याने परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर ग्रंथ ऍमेझॉन आणि वालमार्टवर उपलब्ध आहे. तरी ज्यांना हा ग्रंथ हवा असेल त्यांनी तो ऑनलाईन मागवता येईल.