पहिल्यांदाच 1500 भाविक करतील श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण

नोव्हेंबर महिन्यातील उपक्रम, नाव नोंदणीला आरंभ

0

सुरेंद्र इखारे, वणीः स्थानिक श्री गजानन महाराज सेवा समितीने सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजित केले आहे. 25 नोव्हेंबर 2018ला रविवारी सकाळी साडे सहापासून दुपारी दोन पर्यंत हे पारायण वरोरा रोडवरील एस. बी. लॉन येथे होईल.पारायणानंतर आरती व महाप्रसाद होईल. हा ग्रंथ मुखोद्गत असलेल्या ठाणे येथील विद्या पडवळ उजवणे या पारायणाला उपस्थित राहणार आहेत.

या पारायणात सहभागी होण्याकरिता रंगारीपुरा येथील परशुराम गौरकार यांच्या मेडिकलजवळील कार्यालयात नोंदणी करता येईल. पुढील सदस्यांकडेदेखील आपल्या नावाची नोंदणी पारायणाकरिता करता येईल. विनय कोंडावार, मुन्ना तुगनायत, गुलाब खुसपुरे, विजया नालमवार, अमोल राजकोंडावार, गजानन बोढे, संगीता गुंडावार, अशोक नायगावकर, वर्षा मैंदळकर, सुरेष देशकर, भारती सरपटवार, अर्चना गंजिवार, शीतल आडपावार, जया बिलगये, हेमलता लामगे, जया उपलंचिवार, संध्या गंगशेट्टीवार, कल्पना अंबाडकर, अरुणा गावंडे, नीमा जिवणे, उज्ज्वला चौधरी, शालू रासेकर, माया लोहबडे, किरण कुंचमवार, नेहा काळे, मीनाक्षी गोरंटीवार,

लता सुत्रावे, वंदना सागरे, शीला बिलोरिया, विद्या हिवरकर, श्रृती उपाध्ये, जयमाला दरपे, लक्ष्मी पाटील, कीर्ती कोंडावार, नंदा उपलंचीवार, अर्चना सेंगर, किरण बुरडकर, अनिता पारखी, अनिता सोनटक्के, जयश्री लिडबिडे, तृप्ती उंबरकर, माधुरी नायगावकर, प्रिया बिवलकर, माधवी लाभे, साधना घरोटे, प्रतिभा जोशी, किरण डोंगरकर, कल्पना दिकुंडवार, शोभा रांगणकर, अंजली भट, अपर्णा देशपांडे, प्रणिता हस्तक, सारिका इंगोले, स्मिता सोनटक्के, जयश्री गोरंटीवार, संगीता बाळबुधे वरोरा, कांचन बुजोणे, अर्चना उपाध्ये, माया बोड्डवार भद्रावती. या पारायणाचा लाभ घ्यावा अशी विनंती माधव सरपटवार यांनी वणी बहुगुणीशी बोलताना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.