झरी तालुक्यात बालकामगारांच्या संख्येत वाढ

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात लहान मुलांना शिक्षण देण्याऐवजी पैसा कमविण्याच्या नादात तसेच गरिबीमुळे काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा आदिवासीबहूल तालुका असून निरक्षर अज्ञानी जनांची संख्या जास्त आहे. गरिबी व दारूच्या व्यसनाने घरातील कर्ता पुरुष निकामी होऊन घर उदध्वस्त करीत आहे. ज्यामुळे घरातील महिला (आई) व अल्पवयीन मुलगा व मुलगी मजुरीने शेतातील कामे करणे, लोकांच्या घरातील कामे करणे, मिस्त्री कामावर जाणे, हॉटेलवर नोकरी करणे, चहा कॅन्टीनवर कपबश्या धुणे, पेपर वाटणे, कपड्याच्या दुकानात काम करणे, हमाली काम करणे, ढकलगाडी ढकलणे व इतर अनेक काम करताना दिसत आहे. ज्यामुळे बालकामगारावरील अत्याचारांवर कोणाचेही लक्ष नाही.

 

बालकामगारांसाठीचे नियम फक्त नावापुरते दिसत आहे. काही लहान-मोठे दुकानदार त्यांच्या गरिबीचा तसेच पूर्वी तुझे आई वडील काम करीत असल्याचे सांगून त्यांनाही कमी पगारावर काम करण्यास भाग पाडत असल्याचे दिसत आहे. शासनाच्या नियमानुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित असू नये व लहान मुलांना काम करण्यास भाग पाडणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश आहेत.

 

मात्र  तालुक्यात अल्पवयीन बालमुजुराच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. बालमजुराचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. काही दुकानदार, मिस्त्री ठेकेदार व इतर व्यावसायिक लहान मुलांना इंग्लिश व देशी दारू खरेदी करण्याकरिता पाठविता. त्यांना दारू पिण्याकरिता काही पैसे नाही तर आणलेल्या दारूमधील थोडी दारू पाजतात. ज्यामुळे किशोरवयीन व्यसनाधीन होत असल्याचे दिसत आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसून बालमजुराचा वापर करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.