सुनील इंदूवामन ठाकरे, वणी: पोलीस स्टेशनच्या अगदी होकेच्या अंतरावर असलेले दुकानच चोरट्यांनी फोडले आहे. शनिवारी 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. या चोरीत चोरट्यांनी 20 नग टिना, समोरील लोखंडी अँगल, बसायचे 4 नग लोखंडी बेंच व एक टेबल अशा साहित्याची चोरी केली आहे. आधीच चोरीच्या घटनेमुळे वणीकर त्रस्त आहे. त्यातील एकाही प्रकरणाचा छडा पोलिसांना लावता आला नाही. त्यातच आता पोलीस स्टेशनच्या होकेच्या अंतरावरच चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन वर्षी तरी वणीकरांना चोरट्यांपासून दिलासा मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की तहसील परिसरातील पंचायत समितीच्या सभागृहाजवळ दिलीप भोयर यांचे झेरॉक्सचे दुकान व शेतकरी तक्रार निवारण व मार्गदर्शन केंद्र होते. याच ठिकाणी झेरॉक्स सेंटर देखील होते. अतिक्रमण हटाव मोहिमेत सदर दुकान काढण्यात आले होते. आठ दिवसांपूर्वी दिलीप भोयर यांनी ते दुकान उभे करून सरळ केले होते.
शनिवारी वणीकर नववर्षांच्या स्वागतासाठी सज्ज असताना रात्री चोरटे देखील चांगलेच ऍक्टिव्ह होते. रात्री उशिरा चोरट्यांनी या दुकानातील साहित्यातील चोरी केली. या चोरीत सुमारे 20 नग लोखंडी टीना, बाहेरील 7 नग लोखंडी अँगल, 4 नग बसायचे लोखंडी बेंच व त्यांचे दुकानजवळ ठेवलेला मंगल तेलंग यांच्या मालकीचा एक लोखंडी अँगलचा टेबल असा एकूण 18, हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
सध्या या दुकानाचा केवळ सांगाडा त्याठिकाणी शिल्लक राहिला आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच दिलीप भोयर यांनी वणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भांदविच्या कलम 379 नुसार गुन्हा नोंद केला. पुढील तपास ठाणेदार प्रदीव शिरस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.