आज दुपारी वणीतील वॉटर सप्लाय येथे कपडे वाटप उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज शुक्रवारी दिनांक 16 जून रोजी शहरातील सर्वात मोठे कपडे वाटपाचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता, एसपीएम शाळेजवळ, वॉटर सप्लाय येथे हा कार्यक्रम होणार आहे. स्माईल फाउंडेशनतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाटप करण्यात येणा-या कपड्यांमध्ये नवीन साड्या, जीन्स, पॅन्ट, छोट्या मुलांचे नवीन कपडे, चादर, शॉल, नवीन शूज इत्यादी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यात संपूर्ण कपड्यांमध्ये 90 टक्के कपडे हे नवीन असून उर्वरीत कपडे हे सुस्थितीतील जुने कपडे आहे. गेल्या काही दिवसांपासून स्माईल फाउंडेशनच्या वतीने लोकसहभाग व दानशुरांच्या मदतीने कपडे गोळा करण्याचे काम सुरू होते. ते पूर्ण झाले असून या कपडे व शू वाटपाचा कार्यक्रम आज होणार आहे. विशेष म्हणजे स्माईल फाउंडेशन तर्फे या कोणत्याही कार्यक्रमाचे फोटोसेशन केले जाणार नाही. त्यामुळे या उपक्रमाचा गरीब व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांनी केले आहे.

Comments are closed.