शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेला सुरवात
विवेक तोटेवार, वणी: सीएम चषक अंतर्गत वणीत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पुरुष कबड्डी स्पर्धेला बुधवारी 12 डिसेंबरला सुरवात झाली. या स्पर्धेत जवळपास वणी, झरी व मारेगाव येथील 60 चमुनीं भाग घेतला आहे. पहिला रंगतदार सामना हा चिलई व भांदेवडा यांच्या दरम्यान खेळला गेला. ज्यामध्ये भांदेवडा चमूचा 10 गुणांनी विजयी झाला.
युवकांमधील खेळभावना जागृत ठेवण्यासाठी व विविध खेळांना चालना देण्यासाठी वणीतील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर सीएम चषक अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील शेतकरी सन्मान पुरुष कबड्डी स्पर्धेची सुरवात बुधवारी सायंकाळी झाली. या स्पर्धेचे संयोजक नंदकिशोर उलमाले हे आहेत.
या स्पर्धेत वणी, झरी व मारेगाव तालुक्यातील जवळपास 60 चमुनीं भाग घेतला आहे. सदर स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक 15 हजार एक रुपये, द्वितीय पारितोषिक 10 हजार एक रुपये तर तृतीय पारितोषिक 7 हजार एक रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.
6 डिसेंबरला या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन झाले. तेव्हा महिला कबड्डी स्पर्ध्येला सुरवात झाली. यातील तालूका सस्पोर्टिंग क्लब व तालुका क्रीडा मंडळ या चमूनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा रंगलेल्या सामन्याची एक झलक…