मुकुटबन येथे कोळसा खाणीवर जनसुनावणी

मुकुटबन, अडेगाव, मांगली, मार्की, अर्धवन, रुईकोट व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित

0

सुशील ओझा, झरी: पर्यावरण प्रदूषण नियंत्रक मंडळ चंद्रपूर व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मांगली-मार्की गटातील बी एस ईस्पात कोळसा खदानीची जनसुनावणी ३ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता मुकुटबन येथे घेण्यात आली. या सुनावणीकरिता होते..

जनसुनावणीला अप्पर निवासी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझले, जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, पर्यावरण प्रदूषण नियंत्रक अधिकारी राजू वसावे, कंपनीचे अधिकारी व अनेक शासकीय अधिकारी उपस्थितीत होते. .

सर्वप्रथम मार्की येथील बंडू पारखी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर रमेश उदकवार, ओमप्रकाश तेलंग, रमेश पाईलवार, श्याम बोदकुरवार, चंद्रकांत घुगुल, जयंत उदकवार, नेताजी पारखी, गजानन गारमेलवार, संतोष ढेंगळे, आशीष कुळसंगे, राजू उंबरकर, प्रकाश मॅकलवार, आजाद उदकवार, अनिल तेलंग, वासुदेव विधाते, राहुल सराफ, विजय पिदूरकार, शंकर लाकडे यांनी प्रदूषण, शेतीला भाव, जड वाहतूक, रोजगार, आरोग्य व इतर अनेक विषयांवर विचार मांडले. कोळसा कंपनीने शेतकऱ्यांची शेती २५ लाख रुपये एकरप्रमाणे विकत घ्यावी, या मागणीला मोठा जोर होता. 

कोळसा कंपनीने स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार देऊ, ब्लास्टिंगमुळे भविष्यात धोका निर्माण होणार नाही, रुईकोट गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, वीरांगना कंपनीतील जुन्या कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल, ग्रामपंचायतला विशेष सीएसआर निधी देण्यात येईल, तसेच २०१३ च्या कायद्यानुसार जमिनी विकत घेण्यात येईल, अशी आश्वासने देण्यात आली..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.