पहिला डोस घेतल्यास दुसरा डोस न चुकता घ्या

जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना व्हायरसनंतर डेल्टा व्हायरस आणि आता आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमीक्रोन’ नावाच्या व्हायरसमुळे संपूर्ण जगासमोर पुन्हा एकदा नवीन संकट उभे ठाकले आहे. डेल्टानंतर कोरोनाचा हा नवा वेरिएंट जास्त वेगाने पसरत असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी वर्तवली आहे. खबरदारी म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण मोहीम मोठ्याप्रमाणात राबविण्यात येत आहे. वणी उपविभागात देखील ही मोहीम सुरू असून या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र अद्यापही तालुक्यातील हजारों नागरिकांनी कोरोना लसीच्या दोन्ही डोज घेतल्या नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

शंभर टक्के लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडून गावोगावी लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिकांनी लस घेतली आहे. लसीचा पहिला डोस घेतला असल्यास, विहीत कालावधीत दुसरा डोस न चुकता घ्या” या पद्धतीचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान वणीत ज्यांना सामुहिकरित्या लस घ्यायची असल्यास त्यांच्यासाठी घरपोच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

Podar School

100 टक्के लसीकरण हेच मिशन : विवेक पांडे
तालुक्यात सर्वांनी लस घ्यावी म्हणजेच 100 टक्के लसीकरण हे आमचे मिशन आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी कोविडचे लसीकरण सुरू आहे. त्यात कल्याण मंडपम, आंबेडकर चौक व ग्रामीण रुग्णालय वणी येथे नागरिकांना कधीही जाऊन लस घेता येते. शिवाय लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी लसीकरण सुरु आहे. जर काही लोकांचा गृप असेल किंवा ज्यांना गावात, वार्डात किंवा ठरलेल्या ठिकाणी सामुहिक लसीकरण करायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा. तसेच दिव्यांग आणि वृद्ध यांचे दोन्ही डोस झाले नसल्यास त्यांचे देखील सामुहिकरित्या लसीकरण करता येऊ शकते. लसीकरणाबाबत माहितीसाठी तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा.
– विवेक पांडे, तहसीलदार वणी

लसीकरण केल्यानंतर शासनाकडून मिळालेले लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी शासनाकडून 9013151515 हा व्हॉटस् अॅप नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदरील व्हॉटस्अॅप क्रमांकाद्वारे कोविड लसीकरण प्रमाणपत्र आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे.

कसे मिळवावे लसीकरण प्रमाणपत्र ?
1) 9013151515 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये संचित (Save) करावा.
2) यानंतर व्हॉटस् अॅपवर सेव्ह केलेल्या या क्रमांकावर covid certificate हा मेसेज टाईप करुन पाठवावा.
3) त्यानंतर आपण ज्या मोबाईल क्रमांकावरुन कोविड लसीकरणासाठी नोंदणी केली आहे त्या क्रमांकावर सहा अंकी OTP (One time password) प्राप्त होईल. सदर OTP 9013151515 या व्हॉटस् अॅप क्रमांकावर पाठवावा.
4) त्यानंतर नोंदणी केलेल्या व्यक्तीची यादी व्हॉटस् अॅप वर प्राप्त होईल. त्यापैकी ज्या व्यक्तीचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र हवे आहे त्याचा क्रमांक टाईप करुन पाठविल्यास त्या क्षणी व्हॉटस् अॅप द्वारे त्या व्यक्तीचे कोविड लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त होईल.

प्रमाणपत्र न मिळाल्यास कुठे संपर्क साधावा ?
लसीकरण करुन घेतलेल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरीलप्रमाणे आपले कोविड लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करुन घ्यावे.अनावधानाने लसीकरणावेळी डेटा एन्ट्री न झाल्यामुळे प्रमाणपत्र प्राप्त होण्यास अडचण येत असल्यास आरोग्य विभाग, ग्राम पंचायत, नगर परिषद कर्मचा-यांच्या निदर्शनास सदर बाब आणून द्यावी, जेणेकरुन सदर बाबतीत योग्य कार्यवाही करता येईल.
– जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

हे देखील वाचा:

तब्बल 27 दिवसानंतर वणी आगारातून धावली लालपरी

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!