आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण
दोन्ही गटावर गुन्हे दाखल, सात जणांना अटक
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. याच कंपनीतील १५ सेक्युरेटी गार्डनी वाहनचालक असलेल्या मुलाला मारहाण केली त्यात चालक जखमी झाला.जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.
मुकुटबन येथील सिमेंट कंपनीत बिल्डमेट कंपनी भागीदारीत काम करते. 3 जानेवारी रोजी चालक पांडुरंग मेश्राम हा सुट्टीवर असल्यामुळे त्याची मिनी ट्रॅव्हल वाहन (क्र. Mh 35 K 3836) ही निखिल कुत्तरमारे (26) रा. बोधाड ता. वणी हा सकाळपासून चालवीत होता.
सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास चालक निखिल बिल्डमेट कंपनीचे अधिकारी निरंजन पाईकराव यांचे भाऊ जोगी नारायण पाईकराव यांना कंपनीत घेऊन जात होता. त्यावेळी गेटवर एंट्री करण्याकरिता वाहन थांबविले. गेटवर सेक्युरिटी इंचार्ज थेरे होते .त्यांनी चालक निखिल याला गाडीचे कागदपत्र, लायसन्स व गेट पास दाखविण्यास सांगितले.
कागदपत्र दाखविल्यानंतर गाडी आतमध्ये घेण्याकरिता जात असताना एका सेक्युरिटी गार्डने चालकास अश्लील शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली असे विचारताच गार्ड यांनी चालक निखिल याला काडीने डोक्यावर मारले. मारहाण करण्यात थेरे सेक्युरिटी गार्ड व त्याचे सोबत इतर 15 सेक्युरिटी गार्ड होते.
15 सेक्युरिटी गार्डांनी लथाबुक्यांनी व काठ्यांनी जबर मारहाण केली. डोक्यावर काठीच्या मारामुळे डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला.चालक निखिल घाबरून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सरकारी दवाखान्यात उपचार करून सेक्युरिटी गार्ड मारतील म्हणून घरीच लपून बसला.
4 जानेवारी रोजी निखिल याला बरे वाटत असल्याने मुकुटबन स्टेशनला येऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे .तर सिक्युरिटी गार्ड शिवशंकर ताजने (26) रा. चिलई ता.वणी याने ठाण्यात येऊन लेखी तक्रार दिली, की चालक निखिल कुत्तरमारे ट्रॅव्हल्स घेऊन गेट क्र. 2 वरून आतमध्ये जाण्याकरिता आला.
निखिल दारू पिऊन आहे. तसेच लेबरची एन्ट्री होत असल्याने नंतर ये .नाहीतर दुसरा ड्रायवर घेऊन ये नंतर ट्रॅव्हल्स घेऊन जा असे म्हणताच निखिल याने दिनेश थेरे याला शिवीगाळ केली व गावातील तरुणांना फोन करून बोलाविले. गावातील तरुणांनी पावड्यांच्या व टिकासांच्या दांड्याने उपस्थित सर्व गार्ड लोकांना मारहाण केली. मारहाणीत थेरे यांच्या डोक्याला मार लागला आहे.
अशा तक्रारीवरून दोन्ही गटातील लोकांवर १४३,१४७, १४९,३२४, ५०४,५०६,१३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. निरंजन पाईकराय, जॉनी पाईकराय, विष्णुकांत पेटकर, दीपक दंडेवार, गोलू धगडी, सुनील जींनावार व निखिल उर्फ नितीन कुत्तरमारे यांना अटक करण्यात आली.
पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, जमादार मोहन कुडमेथे, प्रवीण ताडकोकुलवार, शशिकांत नागरगोजे, रंजना सोयाम व नीरज पातूरकर करीत आहेत.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
मा. श्री. संजय देरकर यांची जिल्हा बँकेच्या उपाअध्यक्षपदी निवड झाल्याबाबत हार्दिक अभिनंदन