शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन

विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त स्माईल फाउंडेशनचा उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग 5 ते 7 गट व वर्ग 8 ते 10 अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. शहरातील मुकुटबन रोडवरील श्री विनायक मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा निशुल्क आहे. सामाजिक व शैक्षणिक कार्यात कायम अग्रेसर राहिलेल्या स्माईल फाउंडेशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्माईल फाउंडेशन व विजयबाबू चोरडिया मित्र मंडळतर्फे करण्यात आले आहे.

बक्षिसाची राहणार लूट
वर्ग 8 ते 10 या गटात 5001 रुपये व सन्मानचिन्ह पहिले बक्षिस राहणार असून द्वितीय, तृतिय व चतुर्थ बक्षिस हे अनुक्रमे 3001, 2001 व 1001 रुपये रोख व सन्मानचिन्ह राहणार आहे. तर वर्ग 5 ते 7 या गटात 3100 रुपये रोख व सन्माचिन्ह यासह 2100, 1100 व 501 रुपये रोख व सन्मानचिन्ह असे द्वितिय, तृतिय व चतुर्थ बक्षिस राहणार आहेत.

परीक्षेचे नियम व अटी 
सदर परीक्षा ही निशुल्क आहे. इयत्ता 5 वी , 6 वी आणि 7 वी करीता एक पेपर तर इयत्ता 8 वी 9 वी आणि 10 करीता वेगळा एक पेपर राहणार आहे. पेपरमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान, जनरल नॉलेज, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विषया वरती प्रश्न विचारले जातील. सदर प्रश्न हे त्या गटातील असलेल्या शाळेच्या पुस्तकांमधल्या अभ्यासक्रमावरच आधारीत राहील.

विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याकरिता आपल्या शाळेतील संबंधीत शिक्षकांना संपर्क साधावा लागेल किंवा 7038204209 या नंबर वर संपर्क साधून नोंदणी करता येणार आहे. शनिवारी दिनांक 03-09-2022 संध्याकाळपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेत  विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्माईल फाउंडेशन व विजयबाबू चोरडिया मित्र मंडळतर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी होणार उद्घाटन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.