शिरपूरमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
धीरज डाहुले, शिरपूर: शिरपुर येथील श्री गुरूदेव कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दि. २५/११/२०१७ ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वणीच्या अरुणोदय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक अरुण वैद्य व समन्वयक सतीश डाहुले यांनी यावेळी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सध्या स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे. विद्यार्थ्यांनी जर आधीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास विद्यार्थ्यांना लवकर यश मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी गुरुदेव महाविद्यालयातील वर्ग ११ व १२ च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. यात स्पर्धा परीक्षेचे महत्व, पुर्वतयारी कशी करावी याविषयीची परिपूर्ण माहिती मार्गदर्शकांनी दिली.
याप्रसंगी भारतीय संस्कृती विकास मंडळ शिरपुरचे सचिव पुरुषोत्तमराव कोंगरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विजय करमनकर यांनी केले, तर प्रा.सुधीर वटे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. उपस्थितांचे आभार प्रा.वासुदेव ठाकरे यांनी मानले. या एक दिवसीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. सीमा सोनटक्के, प्रा. गणेश लोहे, प्रा. रूपेश धुर्वे, गणपतराव तुमराम तसंच महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.