बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा धक्का, कर्तव्यावर असलेल्या वाहकाचा मृत्यू

वणी-चंद्रपूर बसमधली घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी वरून चंद्रपूरला जाणा-या बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. किशोर घरत (48) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. ते मुळचे यवतमाळ येथील असून ते वणी आगारात वाहक या पदावर कार्यरत होते. गुरुवारी दिनांक 12 जानेवारी रोजी किशोर घरत हे वणी-चंद्रपूर गाडीत वाहक म्हणून होते. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ते वणीहून निघाले होते. दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास पडोली गावाजवळ त्यांच्या छातीत कळा आल्या. त्यामुळे चालकाने तात्काळ गाडी चंद्रपूरला नेली. मात्र तिथे त्यांना हृदयविकाराचा दुसरा धक्का आला व त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूमुळे एसटी कर्मचा-यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.