मंदर येथील जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा
द ग्रेट पिपल्स गृपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
जितेंद्र कोठारी, वणी: मंदर येथील जि. प. शाळेच्या प्रांगणात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. द ग्रेट पीपल्स ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद गोन्लावार होते तर ॲड. अमोल टोंगे, डॉ. अतिक सैय्यद, मंदरचे सरपंच देवराव देउळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप आस्वले, अस्विनी आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होते. या वेळी गावात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान बिरसा मुंडा यांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात गावातील अभ्यासिकेत अभ्यास करणा-या शुभम बागळे, प्रतीक बुरडकर, भूषण बावणे, शेख शारूप, स्वप्नील उपरे, सूरज नवले, प्रतीक गोवरकर, प्रवीण खेडेकर, दीपक आत्राम या विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. उपस्थितांना मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता डोहे यांनी केले, तर प्रास्ताविक राजू पिपंळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार आकाश महाडोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता बोबडे, दिनेश रायपुरे, राहुल वनकर यांच्यासह द ग्रेट पिपल्स गृपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावक-यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा:
जॉन अब्राहम आलाये परत, सुजाता टॉकिजमध्ये आजपासून सत्यमेव जयते 2
Comments are closed.