कोरोना अपडेट: वणीतील 11 लोक कॉरेन्टाईन

अती जोखीम (हाय रिस्क) असणा-यांचा शोध सुरू...

0

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचे 2 पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 2 रुग्ण आढळताच प्रशासन तत्परतेने कामाला लागले असून त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी रात्री पॉजिटिव्ह आढळलेल्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 11 हाय रिस्क (जोखीम) लोकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. त्यातील 9 व्यक्तींना परसोडा येथील कोविड केअर सेन्टर तर 2 व्यक्तींना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. या 11 ही व्यक्तींचे काल रात्रीच स्वॅब घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दोन पैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह
कुटुंबातील 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यानंतर त्याच कुटुंबातील हाय रिस्क असलेल्या दोन व्यक्तींनी नागपूर येथे तपासणी केली असून त्यातील एका व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. तर दुस-या हाय रिस्क व्यक्तीचा रिपोर्ट आज दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. मात्र ज्या व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे त्या व्यक्तीचे स्वॅब पुन्हा खबरदारी म्हणून तपासणीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

200 मीटरचा परिसर सिल
ज्या भागात हे रुग्ण आढळून आले आहेत त्या वरोरा रोड वरिल मुख्य लोकेशनपासून 200 मीटरचा परिसर सिल केला जाणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान प्रशासनातर्फे कुणीही अफवा पसरवू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मॅसेज व अफवा पसरवू नये, अनावश्कय गर्दी करू नये, शासनाने दिलेल्या गाईडलाईऩचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

परिसर सिल करताना….

वणीत दहशत कायम…
गेल्या दोन दिवसांपासून वणीत कोविडबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र वणीक दोन कोविड रुग्ण आढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पॉजिटिव्ह रुग्ण असलेल्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा वणीत चांगलाच वावर आहे. गेल्या काही दिवसात अनेकांच्या त्यांच्याशी भेटीगाठी झाल्या आहेत. शिवाय व्यवसायामुळेही त्यांचा वणीकरांशी चांगलाच संपर्क येतो. त्यामुळे जी व्यक्ती या दोन जोखिम असेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले त्यांच्यामध्ये चांगलेच घबराटीचे वातावरण पसरले आहेत. गल्लो गल्ली, चौकाचौकात त्यांच्याबाबत चर्चा सुरू आहे.

वणीत कोविडचे रुग्ण आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवनवीन अफवांना उत आला आहे. आज रविवार असूनही रोज जशी गर्दी केली जाते तशी गर्दी करणे वणीकरांनी टाळले. चहा, नाष्टा यासाठी जशी छुप्या रितीने गर्दी केली जाते तशी आज गर्दी दिसून आली नाही. लोकांच्या चेह-यावर गायब झालेले मास्क पुन्हा चेह-यावर दिसू लागले तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत लोकांचा दुरूनच ‘नमस्कार’ सुरू आहे.

सकाळी लॉकडाऊनची अफवा, शॉपीत गर्दी…
कोरोनाचे पॉजिटिव्ह आढळल्याने आता दुकानं बंद होईल, मार्केट बंद होईल अशीही अफवा शहरात पसरली होती. आज वणीतील दोन वाईन शॉपी पैकी एक वाईन शॉपी बंद होती. दोन्ही शॉपी बंद झाली तर अडचण नको म्हणून काही मद्यप्रेमींनी सकाळीच गर्दी करून स्टॉक केल्याची माहिती आहे. यामुळे सकाळी शॉपीसमोर काही काळासाठी लांब रांग पाहायला मिळाली.

नगरपालिकेच्या सर्वेला वेग
तीन चार दिवसांआधी नगरपालिकेने कोरोना विषयक घरोघरी जाऊन सर्वे सुरू केला होता. हा सर्वेसाठी 13 प्रभागासाठी 13 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये शिक्षक, शिककोत्तर कर्मचारी आशा वर्कर इत्यादींचा समावेश आहे. या सर्वेमध्ये घरोघरी जाऊऩ लोकांची माहिती घेतली जातआहे. घरात बाहेरगावाहून कुणी आले का? घरात कुणाला दमा, मधूमेह आहे का? ताप आहे का? इत्यादी माहिती गोळा केली जात आहे. आज आशा वर्कर्सने रुग्ण आढळलेल्या परिसरात जाऊन सर्वे केला.

नगरपालिकेद्वारा सर्वेक्षण सुरू

(हे पण वाचा:  अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….)

धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….

Leave A Reply

Your email address will not be published.