जब्बार चीनी, वणी: गुरुवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तांडव दिसून आले. गुरुवारी तब्बल 22 रुग्ण आढळलेत. यातील 14 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 8 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 12 रुग्ण हे वणी शहरातील आहे. तर 10 रुग्ण इतर भागातील आहे. यात रविनगर येथे 3, शास्त्रीनगर येथे 2, विठ्ठलवाडी येथे 2, पटवारी कॉलनी, टिळक नगर, मनिषनगर, विद्यानगरी व प्रगती नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर चिखलगाव येथे 4, नायगाव खुर्द येते 3 भांदेवाडा, शिरपूर येथे प्रत्येकी एक तर एक चंद्रपूर येथील व्यक्ती पॉजिटिव्ह आला आहे.
गुरुवारी यवतमाळ हून 106 अहवाल प्राप्त झाले यातील 14 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 93 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. गुरुवारी 73 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 08 संशयीत पॉजिटिव्ह तर 65 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. गुरुवारी आलेल्या रुग्णांवरून 16 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 36 अहवाल येणे बाकी आहे.
तालुक्यात 70 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 917 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 824 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. गुरुवारी 12 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. सध्या तालुक्यात 70 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 30 जण होम आयसोलेट आहेत. 24 जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये तर 16 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालुक्यात मृत्यूची संख्या 23 झाली आहे.
शहरात वाढतोय कोरोनाचा प्रकोप
गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता अचानक शहरातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 20 च्या खाली आला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून हा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या कोरोनाची भीती गेल्याने अनेकांनी सावधगिरी बाळगणे कमी केले आहे. त्यामुळेही रुग्ण वाढण्यास मदत होत आहे.
हे पण वाचा…
हे पण वाचा…
[…] […]