नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील 297 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करून,बरे होवून घरी परतल्याने तालुक्यासाठी दिलासा मिळाला आहे.आरोग्य विभागा कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज तालुक्यात 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 207 झाली आहे.
यात शहरातील 7 तर ग्रामीण भागातील 16 असे एकूण 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 207 असून यापैकी पुरके आश्रम शाळा मारेगाव येथील कोविड सेंटर वर 39 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असून उर्वरित खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे.आरोग्य विभागा कडून आज मिळालेल्या माहिती नुसार मारेगाव शहरातील 7 तर ग्रामीण भागातील 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे.मात्र तालुक्यातील 297 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करून,उपचार घेऊन घरी परतल्याने तालुका वासीयांसाठी दिलासा मिळाला आहे.
नेहमी सामाजिक अंतराचे भान ठेवून मास्क,सॅनिटायझर चा वापर करावा.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी,तालुक्यातील कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी 15 ते 30 एप्रिल दरम्यान लादलेल्या संचारबंदीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगर पंचायत चे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले आहे.
हे देखील वाचा: