कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ, 16 ऍक्टिव्ह रुग्ण

आज मध्यरात्रीपासून लागणार संचारबंदी

0

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या अचानक वाढायला सुरूवात झाली आहे. सध्या तालुक्यात 16 पॉजिटिव्ह व्यक्ती आहे. यातील 15 रुग्ण होम आयसोलेट आहेत तर एका रुग्णावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाची अचानक वाढणारी संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी आज मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे आधीच ठरलेल्या कार्यक्रमांवर विरजण येण्याची शक्यता आहे.

आज आज 8 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात सर्व संशयीत निगेटिव्ह आलेत. याशिवाय 3 कोरोना मुक्त व्यक्तींना आज सुट्टी देण्यात आली आहे. सध्या तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1205 असून यातील 1164 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 25 व्यक्तींना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

आज मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू
शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे त्याद्वारा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. सर्व प्रकारचे धार्मिक उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमिलन, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका इत्यादीसह लग्नसमारंभासाठी केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. तर मिरवणूक व रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे.

अंत्यविधीसाठी 20 लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे. सर्व दुकाने व बाजारपेठ रात्री 8 पर्यंतच सुरू राहणार. ईयत्ता 5 ते 5 पर्यंत सुरु असलेल्या फक्त नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या खासगी शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दिनांक 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. तर रेस्टॉरंट व हॉटेल सकाळी 8 ते रात्री 9.30 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

संचारबंदीचे उल्लंघन केल्यास दंड
संचारबंदीचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. जर दुस-यांदा विना मास्क आढळल्यास हा दंड 750 रुपये असणार आहे. तर तिस-यांदा आढळल्यास दंडासह फौजदारी कार्यवाही केली जाणार आहे. दुकानामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास ग्राहकांना 200 रुपये तर दुकान मालकांना 2 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दुस-या वेळी जर दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे  पालन होत नसल्याचे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

हे देखील वाचा:

भालरच्या दलालाचा वणीत ‘जलवा’ (भाग 5)

हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस अटक

 

Leave A Reply

Your email address will not be published.