जब्बार चीनी, वणी: एकीकडे कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या देखील त्याच वेगाने वाढत आहे. आज सोमवारी दिनांक 19 एप्रिल रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. आज तब्ब्ल 86 रुग्ण तालुक्यात आढळले आहेत. ही दुस-या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 31 तर ग्रामीण भागातील 54 पॉझिटिव्ह आढळले. यातील एकट्या मोहदा गावातच 32 रुग्ण आढळून आले आहेत. तर मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. आज 62 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. आज यवतमाळ येथे उपचारादरम्यान तालुक्यातील एका 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
वणी शहरातील कनकवाडी व जैन ले आऊट येथे 4 रुग्ण. रंगारीपुरा, आंबेडकर चौक, शास्त्रीनगर, देशमुखवाडी, माळीपुरा येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर सुभाषचंद्र बोस चौक, माळीपुरा, बेलदारपुरा, गाडगेबाबा चौक, गुरुनगर, वॉटर सप्लाय, रंगनाथ नगर, विठ्ठलवाडी, भोंगळे ले आऊट, जिजाऊ नगर, एचडीएफसी बँक, रवी नगर, मनिष नगर, प्रगती नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.
मोहदा येथे कोरोनाचे तांडव दिसून आले. ग्रामीण भागात आलेल्या 54 रुग्णांमध्ये एकट्या मोहद्यामध्ये 32 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय गणेशपूर येथे 4. राजूर, भालर टाऊनशिप येथे प्रत्येकी 3 रुग्ण, चिखलगाव, नांदेपेरा. मेंढोली, येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर पुरड, लालगुडा, भांदेवाडा, ब्राह्मणी, भालर, शिंदोला येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळ येथून 254 अहवाल प्राप्त झाले. यात 46 जण पॉजिटिव्ह आलेत. तर आज 183 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 40 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 479 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 733 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 378 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 60 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 269 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 49 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2224 रुग्ण आढळून आलेत. यातील 1812 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 34 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा:
50 खाटांच्या ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मंजुरी