जब्बार चीनी, वणी: आज कोरोना बाबत तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज 46 रुग्ण तालुक्यात आढळले आहेत. यात वणी शहरात 18 तर ग्रामीण भागात 18 पॉझिटिव्ह आढळले आहेत. 5-5 रुग्ण झरी आणि मारेगाव तालुक्यातील आहेत. आज 32 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. आज यवतमाळ येथे उपचारादरम्यान वणी तालुक्यातील 3 रुग्णांचा मृत्यू झाला. यात एक 60 वर्षांचा पुरुष तर 56 व 66 वर्षीय महिलांचा समावेश आहे. दरम्यान कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने लॉकडाऊनचे नियम कठोर केले आहे. उद्यापासून अत्यावश्यक सेवा ही केवळ सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंतच सुरू राहणार. अपवाद वैद्यकीय सेवा व त्यासंबंधीत सेवा.
आज मंगळवारी दिनांक 20 एप्रिल रोजी वणी शहरात काजीपुरा येथे 2 तर पंचवटी अपार्टमेंट, काळे ले आऊट. देशमुखवाडी, रंगारीपुरा, विठ्ठलवाडी, सावरकर चौक, गुरुवर्य कॉलनी, कनकवाडी, साईनगरी, लक्ष्मीनगर, राम नगर, यश अपार्टमेंट, पटवारी कॉलनी, विराणी टॉकिज व सानेगुरूजी नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण असे एकूण 18 रुग्ण आढळून आले आहे.
ग्रामीण भागात आलेल्या 18 रुग्णांमध्ये राजूर येथे 5 तर चिखलगाव येथे 4 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. तर बेसा, नायगाव, सावंगी, गणेशपूर, मुर्धोणी, झोला, ब्राह्मणी, वडगाव, भालर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर मारेगाव आणि झरी तालुक्यातील प्रत्येकी 5 व्यक्ती वणी येथे पॉझिटिव्ह आले आहेत.
आज यवतमाळ येथून एकही अहवाल प्राप्त झाला नाही. आज 173 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 46 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 280 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1009 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 390 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 58 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 285 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 47 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2270 रुग्ण आढळून आलेत. यातील 1844 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 36 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
उद्यापासून दुकानाच्या वेळेत बदल
बुधवार पासून अत्यावश्यक सेवांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आधी दुपारी 2 वाजेपर्यंत असलेला तीन तासांनी कमी करण्यात आला असून आता केवळ 7 ते 11 या वेळेतच अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यातून वैद्यकीय सेवा व त्यासंबंधीत इतर अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा, एटीएम, विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा आदी सेवांना सूट देण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार आता दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 पर्यंत राहतील.
हे देखील वाचा:
मुकुटबन व पाटण येथील चारही पॉइंटवरुन पोलीस वगळता अन्य कर्मचारी गायब