जब्बार चीनी, वणी: शहरात आता कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात कमी झाले असून आता ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज तालुक्यात 5 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. काल आलेले देखील सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील होते. आज आलेल्या रुग्णांमध्ये रासा येथे 2 तर भालर वसाहत, कोरंबी मारेगाव व झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले.
मंगळवारी दिनांक 23 मार्च रोजी यवतमाळहून 95 संशयीतांचे रिपोर्ट आलेत. यात 3 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 92 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. याशिवाय आज 90 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 88 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 123 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 699 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 8 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.
सध्या तालुक्यात 67 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 31 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 28 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 8 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1376 रुग्ण आढळून आलेत. यातील 1283 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: