जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 24 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने सलग दुसरे शतक केले आहे. आज तालुक्यात 102 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 49 रुग्ण तर ग्रामीण भागात 51 रुग्ण आहेत. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आले आहेत. आज सध्या तालक्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 562 झाली आहे. आज 57 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. दरम्यान आज 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात 53 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान आजपासून प्रशासनाने विनाकारण फिरणा-यांची कोरोना टेस्ट करण्यास सुरूवात केली आहे. आज 29 व्यक्तीची कारवाई अंतर्गत टिळक चौकात कोरोना टेस्ट करण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे.
आज वणी आलेल्या 49 रुग्णांमध्ये हिराणी ले आऊट येथे सर्वाधिक 6 रुग्ण आढळले आहेत. साने गुरुजी नगर येथे 5 रुग्ण, पंचवटी अपार्टमेंट, कॉटन मार्केट व रवि नगर येथे प्रत्येकी 3 रुग्ण तर रंगारीपुरा, रामपुरा, भारत माता चौक, माळीपुरा, दामले फैल, दिपक चौपाटी, शिवाजी चौक येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय आनंद नगर, पहाड पुरा, वसंत गंगा विहार, श्रीकृष्ण भवन, कनकवाडी, लक्ष्मी नगर, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, वसंत जिनिंग, गोरक्षण, भगत सिंग चौक, वासेकर ले आऊट, टिळक चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागात आलेल्या 51 रुग्णांमध्ये निवली येथे 10 रुग्ण आढळले आहेत. तर निळापूर येथे 5, सैदाबाद येथे 4 तर बोधे नगर चिखलगाव व छोरिया लेआऊट गणेशपूर, नेरड येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहेत. मुर्धोणी, पुनवट, केसुर्ली, वडजापूर, कायर व साखरा येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय शेलू, गणेशपूर, नांदेपेरा, मंदर, रासा, नायगाव, भालर, निंबाळा, कोना, पुरड, पिंपरी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत. असे एकूण 46 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आले आहे.
आज यवतमाळ येथून 271 अहवाल प्राप्त झालेत. यात 75 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 155 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 27 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 175 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप यवतमाळहून 1186 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 562 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 31 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 490 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 41 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2634 रुग्ण आढळून आलेत. यातील 2031 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 41 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा:
6 जणांच्या मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची वणीला भेट