दिलासा… शहर होतेय कोरोनामुक्त, वणीत आजही अवघा 1 रुग्ण

आज तालुक्यात 9 रुग्ण, रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट

0

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी तालुक्यात कोरोनाचे अवघे 9 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागात 8 रुग्ण आहेत. दरम्यान आज 43 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज रुग्णसंख्येचा दर 2.7 टक्के आहे. काल हा 6.6 टक्के होता. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 259 आहे. दिवसेंदिवस ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. वणीत कालही अवघा एक रुग्ण आढळला होता. तर परवा 3 रुग्ण आढळले होते. दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. तर कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्यामुळे लवकरच शहर कोरोनामुक्त होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

आज वणीत विठ्ठलवाडी येथे 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात आलेल्या 8 रुग्णांमध्ये भालर कॉलनी येथे 3 रुग्ण, बेलोरा येथे 2 तर वडगाव, शिरपूर व राजूर कॉलरी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

आज यवतमाळ येथून 332 अहवाल प्राप्त झालेत. यात 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 102 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 262 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 699 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 259 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 31 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 185 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 43 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5149 रुग्ण आढळून आलेत. यातील 4806 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 84 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

रुग्णसंख्येचा दर पुन्हा खाली
आज आरटीपीसीआर व ऍन्टीजनच्या एकूण 434 रिपोर्टपैकी अवघे 9 जण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्येचा हा दर 2.7 इतका आहे. काल ही इतकेच रिपोर्ट प्राप्त झाले होते. मात्र यात रुग्ण 29 आढळून आले होते. हा दर 6.6 इतका होता सध्या खेडोपाडी टेस्ट कॅम्प होत असल्याने कोरोनाचे लवकर निदान होत आहे. तसेच लॉकडाऊनचा फायदाही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात मोजके रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे वणी शहर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा:

पॉकेटमनी गोळा करून विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात

एका लग्नाची ही निराळीच गोष्ट, अनाथ मुलीच्या लग्नात गहिवरले वऱ्हाडी….

Leave A Reply

Your email address will not be published.