अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी मृत्युंजयदूतांना मार्गदर्शन

करंजीच्या महामार्ग पोलीस मदत केंद्राचा उपक्रम

0

नागेश रायपुरे, मारेगाव: महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने “मृत्युंजयदूत योजने” अंतर्गत महामार्ग क्र.6 वर मोहदा येथील हिंदुस्थान धाबा येथे मृत्युंजयदूतांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेसंदर्भात माहिती देऊन फर्स्ट एड किटचे वाटप करंजी येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने करण्यात आले.

महामार्ग वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून राज्यात “मृत्युंजयदूत”योजनेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने महामार्ग क्र.6 वर मोहदा येथील हिंदुस्थान धाबा येथे 10 मृत्युंजयदूतांना अपघातांविषयी पो. उप.नि. विनोद कुमार तिवारी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मृत्युंजयदूतांना अपघातग्रस्त व्यक्तींना कशा पद्धतीने मदत करायची, त्यांना कशा पध्दतीने हाताळायचे हे प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रत्येक मृत्युंजयदूताला राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दवाखाने व रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक देण्यात आल
े.

तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजने संदर्भात माहिती देण्यात आली.व फस्टऍड किट चे वाटप सुद्धा करण्यात आले. हे शिबीर मा.पोलीस अधीक्षक सो.प्रादेशिक विभाग नागपूर व पोलीस उपअधीक्षक प्रादेशिक विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली करंजी महामार्ग पोलीस केंद्रांचे पो.उप.नि. विनोद कुमार तिवारी यांनी मृत्युंजय दूतांना प्रात्याक्षिका द्वारे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.

हेदेखील वाचा

वणी शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज अवघा 1 रुग्ण

हेदेखील वाचा

पॉकेटमनी गोळा करून विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात

हेदेखील वाचा

मारेगाव तालुक्याला दिलासा, 16 रुग्णांनी केली कोरोनावर मात

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!