ग्रामीण भागातही ओसरतोय कोरोना, आज तालुक्यात 7 रुग्ण

ऍक्टिव्ह रुग्णांचीं संख्या आली शंभराच्या घरात

0

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 28 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे अवघे 7 रुग्ण आढळलेत. यात शहरात 2 रुग्ण तर ग्रामीण भागात 5 रुग्ण आहेत. वणी शहरात जैन ले आऊट येथे 2 रुग्ण आढळलेत. तर ग्रामीण भागात पार्डी (गोवारी) येथे 2 रुग्ण तर चिखलगाव, गणेशपूर, घोन्सा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. दरम्यान आज 47 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 167 आहे.

गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात वाढत होते. पण आता ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे रुग्णांचा दरही सातत्याने कमी होताना दिसत आहे. दोन आठवड्याआधी मृत्यूचा दर अचानक वाढला होता. आता मृत्यूदरही काही प्रमाणात कमी झाल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे.

आज यवतमाळ येथून 314 अहवाल प्राप्त झालेत. यात 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 78 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आला. आज आलेल्या रुग्णावरून 96 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 268 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 167 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 32 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 102 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 33 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5214 रुग्ण आढळून आलेत. यातील 4961 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 86 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

छोरीया ले आऊटमधील फ्लॅटमध्ये भीषण आग

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.