दिलासा: आज 138 रुग्णांची कोरोनावर मात, तर 34 पॉझिटिव्ह

जिल्हाधिका-यांची बैठक होताच प्रशासन ऍक्शन मोडमध्ये

0

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात केवळ 34 पॉझिटिव्ह आढळलेत. यात वणी शहरातील 13 रुग्ण तर ग्रामीण भागातील 20 रुग्ण आहेत. तर एक रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहे. आज काही प्रमाणात दिलास मिळाला असला तरी यवतमाळ हून एकही रिपोर्ट प्राप्त न झाल्याने रुग्णसंख्या कमी आहे. मात्र तरी देखील रुग्णसंख्येचा दर काही प्रमाणात कमी होताना दिसत असल्याने पिक उतरत असल्याचे दिसत आहे. आज 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज यवतमाळ येथे एका 38 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी जिल्हाधिकारी यांनी वणीत आढावा बैठक घेतली. त्यानंतर वणीमध्ये सकाळपासून कारवाईस सुरुवात झाली. यात अर्धे शटर पाडून व्यवसाय करणा-या अनेक व्यापा-यांवर कारवाई कऱण्यात आली.

वणी शहरात आलेल्या 13 रुग्णांमध्ये प्रगतीनगर येथे 3 रुग्ण, तर सर्वोदय चौक, ढुमे नगर, महावीर नगर, माळीपुरा, जैन लेआऊट, मनीष नगर, सानेगुरुजी नगर, गुरू नगर, काजीपुरा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

आज ग्रामीण भागात आलेल्या 20 रुग्णांमध्ये शिरपूर व ढाकोरी येथे सर्वाधिक 3 रुग्ण आढळलेत. तर राजूर, पुनवट, मंदर येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. बोधाड, बोर्डा, मजरा, पेटूर, वारगाव, पिंपरी, मेंढोली, वरझडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

आज यवतमाळ येथून एकही अहवाल प्राप्त झाले नाहीत. आज 146 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 34 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 244 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. अद्याप 840 व्यक्तींचे रिपोर्ट यवतमाळहून येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 955 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 946 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 40 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4102 रुग्ण आढळून आलेत. यातील 3084 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 63 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

कोरोना पॉझिटिव्ह इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ऍम्बुलन्स चालकांकडून रुग्णांची लूट, दुप्पट ते तिप्पट वसुुली

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.