वणीत पहिल्या दिवशी 36 जणांना दिली कोरोना लस

आरोग्य कर्मचारी नितीन खडतकर यांना लसीचा पहिला मान

0

जितेंद्र कोठारी, वणी: अवघ्या जगाला हादरून सोडणारी कोरोना महामारीला देशातून हद्दपार करण्यासाठी जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम आज शनिवारपासून सुरु झाली. कोरोना लसीकरण मोहिम अंतर्गत शनिवार 16 जाने. रोजी वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत लसीकरण शिबिराचे उदघाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, न.प. आरोग्य सभापती सौ. मंजुषा झाडे, तालुका वैधकीय अधिकारी डॉ. विकास कांबळे उपस्थित होते.

      

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील आरोग्य कर्मचारी नितीन खडतकर यांना सर्वात पहिली लस घेण्याचे सन्मान मिळाला. त्यानंतर आरोग्य कर्मचारी पांडुरंग खिरटकर, स्टाफ नर्स रोशनी मगर, पायल पाटील, डॉ.धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. विवेक गोफने, डॉ. अरुण विधाते, डॉ. प्रेमानंद आवारी सह आरोग्य विभागातील 36 व्यक्तींनी कोरोना वॅक्सीन देण्यात आली.

         

जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ व जिल्हा निवासी अधिकारी (बाहय संपर्क) यांचे निर्देशानुसार शनिवारी सकाळी 10.30 वाजता पासून सायंकाळी 5 वाजे पर्यंत कोविड-19 लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आले. कोविड- 19 लसीकरण लाभार्थीची थर्मल गन टेस्ट, हँड सॅनिटायझिंग नंतर नोंदणी करून लस देण्यात आली. ब्लडप्रेशर व शुगर पेशंट व्यक्तींना लसीकरण करण्यात आले नाही.

           

सोमवारपासून पुन्हा लसीकरण कार्यक्रम

वणी तालुक्यात कोरोना लसीकरणासाठी एकूण 120 डोज ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झालीआहे. लसीकरण शिबिराच्या पहिल्या दिवशी एकूण 36 व्यक्तींना लस देण्यात आली. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवार पासून लसीकरण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येईल. ज्या व्यक्तीना कोरोना आजार होऊन एक महिना उलटला असेल अश्या सर्व व्यक्ती लस घेण्यास पात्र राहील. 

लसीकरण शिबिर दरम्यान यवतमाळ जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अजित गवई यांनी शिबिराला भेट दिली. कोविड-19 लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका वैधकीय अधिकारी डॉ. विकास कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. के.झेड.पोहे, डॉ. प्रेमानंद आवारी, डॉ. अरुण विधाते, डॉ.विवेक गोफने, स्टाफ नर्स श्रीमती जयश्री इंगोले, अरुणा गुरनुले, नीलिमा कुळमेथे, प्रकाश काळे, शशांक देसाई, आशा वर्कर अंजु वानखेडे यांनी अथक प्रयत्न केले.

हे देखील वाचा:

चिकनचे रेट अर्ध्यावर, 20-25 टक्क्यांनी खप घटला

अल्पवयीन मुलीला करायला गेला प्रपोज, पोलिसांनी ठोकल्या बेडा

Leave A Reply

Your email address will not be published.