झरी येथील सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार ?
एका वर्षांत रस्ता उखडला, बिल न काढण्याची मागणी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील एकमेव नगरपंचायत झरी असून नगरपंचायत अंतर्गत १७ वॉर्ड आहे. नागरपंच्यात अंतर्गत १७ वॉर्डातील सिमेंट रस्ते बनविण्याकरिता वैशिष्ठपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटीची निधी मिळाला. त्या अनुषंगाने सदर सिमेंट कामाचा संपुर्ण निधी शासकीय बांधकाम विभाकडे जमा झाला व झरी येथील १७ वॉर्डामध्ये सिमेंट रोडचे कामे एक वर्षांपूर्वी करण्यात आले.
१७ ही वॉर्डातील बहुतांश रोडची दुर्दशा झाली असून अनेक रोड उखडून गेले तर मोठमोठे भेगा पडल्या आहे. ज्यामुळे सिमेंट रोड कोणत्या क्वालिटीचे बनले हे उघड झाले आहे. बहुतांश सिमेंट रोडच्या कामात सलाखी वापरण्यात आल्या नसल्याची तसेच रोडची सायडिंग सुद्धा भरणी नसल्याने रोड खचत जात असल्याचा आरोप स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी केला असून सदर रोडची गुणवत्ता तपासणी केल्याशिवाय बिल काढू नये अशी मागणी केली आहे.
नित्कृष्ट दर्जेचा काम सुरू असताना प्रशासन झोपा काढत होते का असाही संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे. शासकीय बांधकाम विभागाच्या मिलीभागत कार्यामुळे झरी येथील सर्व सिमेंट रोडच्या कामात मोठा भ्रष्टाचार होऊन लाखो हडप केल्याचा आरोप लेंडे यांनी केला आहे. जर सर्व रोडची गुणवत्ता तपासल्या शिवाय बिल काढल्यास उपोषणाला बसणार असा इशारा लेंडे यांनी दिला.