कोवीड 19 अंतर्गत नवरगाव येथे ग्रामस्थांची तपासणी

मारेगाव तालुका तालुका आरोग्य विभागाचा उपक्रम

0

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथे तालुका आरोग्यविभागच्या वतीने कोविड 19 अंतर्गत सोमवारी जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी झाली. शिबीरात नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. तसेच गरोदर मातांचीदेखील तपासणी झाली.

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य विभाग तालुक्यातील गावागावांत जाऊन तपासणी शिबीर घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवरगाव येथे सोमवारी 17 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांची तपासणी करून त्यांचे स्वेब घेण्यात आले. दरम्यान या तपासणी शिबिरात गावातील कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. या शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ.केंन्द्र वेगावचे डॉ. सतीश कोडापे यांनी कोरोनाविषयी उपस्तीत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच सुनीता सोनुले, उपसरपंच विलास नक्षणे, मुख्याध्यापक मलकापुरे, डॉ. सतीश कोडापे, डॉ. ए.एस.शेख, आर.डी. लांबट, ए. एस. कुलमेथे, मंदावार, योगिता सलामे, नेहा मंगेवार, किरण शेंडे, विनोद आत्राम, आशीष झाडे, सीमा पेंदोर, दुर्गा मोहूर्ले आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.