सुशील ओझा, झरी: तालुक्यातील निंबादेवी शिवारात वाघाने 1.30 ते 2 वाजता दरम्यान एका गाईवर हल्ला करून ठार केले. ही गाय निंबादेवी येथील शेतकरी दिलीप लक्ष्मण वड्डे यांची असून गाय चरण्याकरिता जंगलात गेली होती. त्यावेळी वाघाने हल्ल्या केला. यात शेतक-याचे सुमारेस 30 हजारांचे नुकसान झाले आहे.
या बाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. झालेली नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतक-याने केली आहे. वाघाच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्याकरिता घाबरत आहे.
तालुक्यात वाघाचा कहर सुरू असून दिनांक 9 जुलै रोजी पिवरडोल येथील अविनाश लेनगुरे या 17 वर्षीय तरुणावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला होता. सदर घटना देखील पिवरडोल परिसरातच घडली. गायीला ठार करणारा वाघही तोच असल्याचे बोलले जात आहे. अखेर सोमवारी दिनांक 12 जुलै रोजी दुपारी वाघाला रेस्क्यू टीमने जेरबंद केले.
मांडवी परिसरात वाघांचा मुक्त संचार
पिवरडोलपासून दोन किलोमीटर अंतरावर मांडवी गाव आहे. या गावालगतच्या शेतशिवारात बिजली या वाघिणीचा तिच्या 3 बछड्यासह वावर आहे. बिजलीचाच बछडा रंगा (रंगिला) व नुरा यांचा देखील याच परिसरात मुक्त संचार आहे. रंगाला रेस्क्यू टीमने सोमवारी जेरबंद केले असले तरी आणखी वाघांचा संचार तिथे आहे. सततच्या हल्ल्याच्या घटनेमुळे त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.
हे देखील वाचा:
सर आली धावून, माती-मुरुम गेले वाहून… चारगाव ते ढाकोरी (बो) रस्ता 15 दिवसातच जैसे थे
मुंगोलीवासीयांनी घेतली मंत्री वडडेट्टीवार यांची भेट, समस्या सोडवण्याची मागणी