विवेक तोटेवार, वणी: शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना अपघात किंवा इतर आजाराने मृत्यूला समोर जावे लागते. अशाच एका गायीच्या पायाला जखम झाली असताना युवसेनच्या कार्यकर्त्यांनी गायीला ताब्यात घेतले व पशुचिकित्सकांना बोलवून त्यांच्याकडून उपचार करीत मानवतेचा परिचय दिला आहे.
सोमवारी सायंकाळी शहरातील टिळक चौक परिसरात एक गाय जखमी अवस्थेत फिरत होती. ही बाब माळीपुऱ्यात राहणाऱ्या काही युवकांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या गाईला पकडले व मंगळवारी सायंकाळी पशुचिकित्सक डॉ. जाधव यांच्याकडून त्या गायीवर उपचार केला.
या गायीच्या समोरचे दोन्ही पायांना जखम झाली होती. या झालेल्या जखमेमुळे गायीला नीट चालतादेखील येत नव्हते. डॉक्टरांनी ही जखम स्वच्छ करून पायावर उपचार केला. सदर गाय ही कुणाची आहे हे अद्याप कळू शकले नाही.
शहरात अनेकदा जखमी अवस्थेत गायी फिरताना दिसतात. मात्र त्याकडे कुणाचे लक्ष जात नाही. मात्र माळीपुऱ्यातील युवकांनी केवळ याकडे लक्ष दिले नाही तर गायीवर उपचार करत मानवतेचा परिचय दिला आहे. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा, शहर संघटक कुणाल लोणारे व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.