नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नगर पंचायत कार्यालयावर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. नगरपंचायतीला कायम स्वरूपी मुख्याधिकारी द्यावा, एमआयडीसी सुरू करावी, अतिक्रमीत लोकांना कायम स्वरूपी पट्टे द्यावे इ मागणीसह शहरातील समस्येचे निराकरण करावे इ मागणी करण्यात आल्या.
घरकुल योजने अंतर्गत अनेक घरांचे अर्धवट बांधकाम पूर्ण झालेले आहे. धनादेश रखडल्याने हे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे तात्काळ धनादेशाचे वितरण करावे, घरकुल योजनेची तिसरी यादी प्रकाशित करावी, पंतप्रधान घरकुल योजनांचा लाभ गरजू लोकांना वगळून सतेत असणाऱ्या लोकांना लाभार्थी बनवण्यात आले अशा लोकांवर तात्काळ कार्यवाही करावी इ मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शहरात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. यात पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, शहर स्वछता व घनकचरा वापर वाहन सौंदर्यीकरण इत्यादीं गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष द्यावेय याशिवाय वृक्ष लागवड केलेल्या खर्चाचा तपशील द्यावा, विना परवानगी बांधकाम झालेल्या घरांना नियमित करा, बसस्थानकाचे बांधकाम तात्काळ सुरू करा. 1 ते 17 ही प्रभागात प्रलंबित असलेले नाल्या रस्त्याची कामे चालू करा, इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी भाकपचे बंडू गोलर, सामाजिक कार्यकर्ते पुडलीक साठे, जांबुवंत खंगार, बंडू कोवे, प्रफुल्ल आदे, मनोहर निखाडे, विनोद ढोके, बापूराव आडे, किशोर चौधरी, नागोराव बावणे, शेख खलील, कुंदन ढुमने, रामभाऊ गेडाम, रामभाऊ जिड्डेवार यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)