जैताई मंदिरात एका दिवसात सव्वा लाख पार्थिव शिवलिंगची निर्मिती

जितेंद्र कोठारी, वणी: येथील जैताई माता मंदिरात एका दिवसात मातीचे सव्वा लाख पार्थिव शिवलिंग तयार करण्याचा विक्रम सोमवार 7 ऑगस्ट रोजी करण्यात आला. श्री काशी शिवपुराण कथा समिती, वणी तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील शेकडो शिवभक्त महिला पुरुष सहभागी झाले होते. त्यांनी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजे पर्यंत काळया मातीचे सव्वा लाख पार्थिव शिवलिंग तयार केले. संध्याकाळी या पार्थिव शिवलिंग रुद्राभिषेक व आरतीचे आयोजन करण्यात आले.

वणी येथे 27 जनवरी ते 2 फरवरी 2024 पर्यंत श्री काशी शिवपुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने श्री काशी शिवपुराण कथा समिती तर्फे सव्वा लाख पार्थिव शिवलिंग तयार करण्यात आले. यापूर्वी 27 जुलै रोजी सव्वा लाख श्री शिवाय नमः स्तुभ्य बीज मंत्र जपचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले होते.

वणी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व शिवभक्त राजकुमार जयस्वाल व त्यांच्या पत्नी शिवभक्त श्रद्धा जयस्वाल यांच्यातर्फे श्री काशी शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा (सिहोर वाले) हे यावेळी शिवपुराण कथा वाचन करणार आहे. वणी व परिसरातील हजारो शिवभक्तांच्या सहकार्याने यवतमाळ मार्गावर पळसोनी फाटा परिसरात 25 एकर परिसरमध्ये कथा मंडप तयार करण्यात येणार आहे.

पार्थिव शिवलिंगची निर्मिती करताना महिला

येणाऱ्या भाविकांच्या भोजन व महाप्रसादची व्यवस्था 10 एकर जागेत तसेच वाहनाच्या पार्किंगसाठी 20 एकरचे पार्किंग स्थळ तयार करण्यात येईल. या भव्य दिव्य कार्यक्रमात अनेक महानुभाव व लाखों भाविक येणार असल्याची माहिती आयोजक राजकुमार जयस्वाल यांनी दिली.

Comments are closed.