गुन्हेगारीच्या विळख्यात कोंडतोय मारेगावचा श्वास
अवैध धंदे बंद करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे निवेदन
जोतिबा पोटे, मारेगावः दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढत चालल्या. या गुन्हेगारीच्या विळख्यात शहरातील सामान्यजनाचां श्वास कोंडत आहे. त्यामुळे इथले अवेैध व्यवसाय बंद व्हावेत आणि उपाययोजना व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भारत मत्ते यांनी पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. या अवैध धंद्यांवर वेळीच आळा बसला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
हा तालुका आर्थिदृष्ट्या तसा विशेष संपन्न नाही. सामान्य शेतकरी आणि मजूर या परिसरात मोठ्या संख्येने आहेत. मात्र यातील बहुसंख्य जुगार वगैरे दुष्टचक्रात सापडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, या परिसरात व्यसनाधिनताही त्यासोबतच वाढली आहे. त्यामुळे वाढणारे कौटुंबिक कलह हीदेखील एक नवीन समस्या आ वासून उभी आहे.
यातील अधिकांश हे बेराजगार आहेत. यात तरूणांचाही मोठा भरणा आहे.
केवळ युवकच नव्हे तर शाळकरी विद्यार्थ्यांवरही याचा वाईट परिणाम होत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात, वणी रोडवर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागेदेखील अवैध धंद्यांना ऊत आला आहे. शासकीय गोडाऊनमागील क्वाईन बॉक्स असो की मनोरंजन क्लब असो, ही अवैध धंद्यांची ठिकाणं होत आहेत.
या परिसरातील दारूची समस्या बिकट होत चालली आहे. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यालाही इथून अवैधरीत्या दारूचा पुरवठा होतो. मारेगाव नगरपंचायतीने ठराव घेऊन अवैध धंदे बंद करावेत अशी अपेक्षाही या निवेदनातून केली आहे. मारेगाव ही परिसरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे इथे नेहमीच वर्दळ असते.
त्यातही शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मुख्य मार्गावर राबता असतो. त्यामुळे अनेक अपघात सातत्याने होत असतात. या वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याकरिता. मार्डी चौक आणि आंबेडकर चौकात टॅफीक पोलीस तैनात करावे असंही या निवदेनात म्हटलं आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात ही सगळी प्रक्रिया झाली.