अतिवृष्टिमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या,
झरी तालुक्यातील शेतकऱ्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी.
सुशीलओझा,झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याना भेटून झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तरी झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
चालू वर्षीच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन पीक हातचे गेलेले आहे. माहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत झरी जामणी तालुक्यात
अतिवृष्टी झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशीचे नुकसान झालेले आहे.
पावसामुळे सोयाबीन खराब झाले तसेच कापूस भिजल्यामुळे व जोरदार पावसाच्या सरीमुळे कापूस जमिनीवर पडल्यामुळे कपाशीचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीन व कपाशीच्या झालेल्या नुकसानीचे झरी तालुक्यातील व जिल्ह्यातील संबंधित शासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची पाहणी तथा तपासणी केली नसून पंचनामासुध्दा करण्यात आलेला नाही.
त्यामुळे सदर पिकांची नुकसान भरपाई तथा मदत मिळणार की, नाही याबाबत आमच्या मनात संभ्रम
निर्माण झालेला आहे. अशी आपली व्यथा लेखी निवेदनाच्या स्वरूपात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना यवतमाळ येथे भेटून झरी तालुक्यातील गिरीधर उईके, बंडू गुरुनुले, निखिल वनकर, वामन भोंग, दयाकर भोंग, कैलास अकलवार, राजू भोग, श्रीराम भोयर, संतोष मंचलवार, संजय वडस्कर, निखिल चौधरी आदी शेतकऱ्यांनी केली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)