निसर्गप्रेमींची नवरगाव धरण बघण्यासाठी गर्दी

संततधार पावसामुळे नवरगाव धरण ओव्हरफ्लो

सुरेश पाचभाई, बोटोणी: गेल्या तीन-चार दिवसांपासून मारेगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नवरगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरण बघण्यासाठी केवळ परिसरातील नागरिक नाही तर चंद्रपूर, मारेगाव, वणी तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात निसर्गप्रेमी येत आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी-नाले तुडुंब भरले आहेत. निर्गुडा नदीवर नवरगाव येथे धरण बांधले आहे. हे धरण मध्यम प्रकल्प आहे. पावसामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले. दरम्यान नदीला पूर आल्याने काही काळासाठी नवरगावचा काही गावांशी संपर्क तुटला होता. मात्र पाणी ओसरल्याने रस्ता पुन्हा सुरू झाला.

धरण ओव्हरफ्लो झाल्याचे कळताच परिसरातील निसर्गप्रेमींनी हे मनोहारी दृष्य बघण्यासाठी धाव घेतली आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस, वणी, मारेगाव, शिरपूर, तसेच परिसरातील गावातील लोक इथे येऊन आनंद लुटत आहे. सेल्फी आणि मोबाईलवर फोटो घेऊन निसर्गाचे हे सौदर्य ते आपल्या कॅम-यात टिपताना दिसत आहे. त्यामुळे अलिकडे काही दिवसांपासून शांत असलेल्या या परिसराला आता चांगलीच रौनक आली आहे. दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

तुम्ही फक्त साद घाला, मी प्रतिसाद देईल: ठाणेदार शाम सोनटक्के

पिंपरीच्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत गाठावी लागते शाळा

Comments are closed.