मुसळधार पावसामुळे शेतातील भाजीपाल्याच्या रोपटे गेले वाहून
शेतकऱ्यांचे सुमारे 80 हजारांचे नुकसान, लांडगी पोड येथील घटना
सुशील ओझा, झरी: गेल्या 4-5 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्या किनाऱ्या जवळील शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गवारा शिवारातील लांडगी पोड येथील शेतकरी सुधीर कवडू किनाके यांच्या 3 एकर शेतातील भाजीपाल्याची झाडे वाहून गेल्याने 80 हजाराचे नुकसान झाले आहे.
कुमरे यांनी तीन एकर मध्ये टमाटर, वांगी, मिरची व कोबीची लागवड केली होती. परंतु पावसाच्या झडीमुळे 3 एकर शेतातील भाजीपाल्याची रोपटे वाहून गेल्याने शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झाल्याची माहिती शेतकरी कुमरे यांनी तलाठयाला दिली परंतु तलाठी पंचनामा करण्याकरिता पोहचले नसल्याचे शेतकरी कुमरे यांनी सांगितले.
पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाच्या नुकसाणीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेकर्यांच्या पिकाचे पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी आधी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.
हे देखील वाचा: