झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन

दहा दिवस तालुक्यात ठिकठिकाणी कार्यक्रम

0

 

सुशील ओझा, झरी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड झरीतर्फे दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे. यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दि. ३ जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता मुकूटबनला नेताजी पारखी यांच्या निवास्थानी सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघ वणीचे माजी अध्यक्ष ऋषिकेष पेचे असणार आहे तर मार्गदर्शक म्हणून संजय गोडे, प्रकाश पिंपळकर असणार आहे. दि. ४ जानेवारी रोजी खातेरा येथे विशाल ठाकरे, दि. ५ जानेवारी रोजी अडेगाव येथील नितेश ठाकरे दि. ६ जानेवारी रोजी मुकुटबन येथे कपिल श्रुंगारे यांच्या निवासस्थानी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष इंजि. अनंत मांडवकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ७ जानेवारी रोजी गणेशपूरला शिवाजी बेलेकर यांच्या निवासस्थानी तर दि. ८ जानेवारी रोजी गीतचार्य तुकारामदादा वाचनालय, कोसारा इथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ जानेवारी रोजी डॉ. ए.पी.जे. कलाम वाचनालय पुरड इथे वैभव ठाकरे यांचे स्पर्धा परीक्षेसंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर समारोपीय कार्यक्रम हा दि. १० जानेवारी रोजी हनुमान मंदिर डोंगरगाव इथे होणार आहे. या दहा दिवसांच्या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.