मोहुर्ली शेतशिवारातील नाल्यात आढळला इसमाचा मृतदेह

सोमवारी संध्याकाळी घटना उघडकीस.... आत्महत्या की अपघात?

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मोहुर्ली नजीक असलेल्या नाल्यात एक इसमाचा मृतदेह आढळून आला. सोमवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती जगन तोडासे (38) असे मृतकाचे नाव असून तो माहुर्ली या गावातील रहिवासी होता.

Podar School 2025

मारोती हा गावात आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास बकरी चराई करून परत येणा-याला मोहुर्ली व विरकुंड दरम्यान मोहुर्ली शेतशिवारातील नाल्यात एक मृतदेह तरंगताना आढळला. त्याने याची माहिती त्वरित गावातील काही लोकांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर मृतदेह हा मारोती जगन तोडासेचा असल्याचे निष्पन्न झाले. मारोती हा दोन दिवसांपासून घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. मृतदेह फुगून असल्याने दोन दिवसांआधीच मारोतीचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणीतील ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला. मारोतीने आत्महत्या केली की हा एक अपघात होता? हे पीएम रिपोर्ट आल्यानंतर कळेल. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.